Eknath Shinde : देणारा कोण;फसवणारा कोण याचा विचार मराठा समाजाने करावा

Continues below advertisement

Eknath Shinde : देणारा कोण;फसवणारा कोण याचा विचार मराठा समाजाने करावा  

हेही वाचा : 

मी जे बोलतो ते करतो. मराठा समाजाला मी स्वत:, आम्ही आरक्षण देणार आहे. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. ते गुरुवारी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे (Manjoj Jaragne Patil) यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मनोज जरांगे यांच्या रुपाने मराठा समाजाचं मोठं आव्हान असेल. त्याचा सामना कसा करणार, असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका रोखठोक शब्दांत स्पष्ट केली.

हे बघा आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेदेखील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण कोणी घालवलं, ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही.  आतादेखील आम्ही आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्यासाठीही आटापिटा सुरु आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram