Eknath Shinde Vitthal Mahapuja : एकनाथ शिंदेंना विठ्ठलाच्या पूजेचा मान ABP Majha

जवळपास मागील 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या, 2 जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्याआधी हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर सहकारी घटक पक्षातील आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार हे भाजप आमदारांसह हॉटेल ताजमध्ये वास्तव्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola