Eknath Shinde on Shiv Sena MLA : शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde on Shiv Sena MLA : शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? शिंदेंची पिहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackrey vs Eknath Shinde: मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.