Eknath Shinde on Ramdas Kadam : प्रवाहात राहायचंय, सेकंड इनिंग जोरदार सुरु करा- एकनाथ शिंदे
गेल्या काही महिन्यांमध्ये एकाकी पडलेले कोकणातील नेते रामदास कदम यांचे शिवसेनेत पुनर्वसन होण्याचे संकेत मिळतायत... रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही रामदास कदम यांना शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले. शिंदे यांनी रामदास कदम यांचं कौतुक केलंय. प्रवाहात राहायचंय तर सेकंड इनिंग जोरदार सुरु करा, आम्ही पाठीशी आहोत असं शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलंय. त्यामुळे कदम यांचं शिवसेनेत जोरदार कमबॅक होणार असल्याची चर्चा रंगलीय.