Eknath Shinde : 400 पार चा नारा देण्यात आला, लोकांनी डोक्यात ठेवलं; गडबड झाली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde, Mumbai : "एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी नेहमी पुढे असतो. मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, पण वेळेचं बचत व्हावं यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे. तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. 2022 ला बांबू लावला होता. यावेळी बांबू लावले नसते तर आज ही बैठकीला या ठिकाणी हजर नसतो. सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते. एक विचारधाराची सरकार येणं गरजेचं होतं. या निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला,थोडं मला रडवलं", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शेती पिक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते.