Eknath Shinde Gadchiroli Encounter: नक्षल्यांविरोधातील मोठ्या कारवाईचं एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक

 नक्षल्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांचा गडचिरोली पोलिसांनी खात्मा केला.  त्यामुळे गडचिरोली पोलिसांचं आज सर्वस्तरातून कौतुक होतंय. गडचिरोली पोलिसांचं पथक गस्त घालत असताना नक्षल्यांनी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर दाखल केलेल्या कारवाईत २६ नक्षल्यांना कंठस्नान घातलं. त्यात २० पुरुष नक्षली तर ६ महिला नक्षलींना मारण्यात सी-६० पथकाला यश आलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पोलिसांच्या विविध पथकांनी एकत्र येत काल नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली. त्याचं कौतुकही एकनाथ शिंदेंनी केलं. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola