Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?
Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता गृहखात्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. जर एकनाथ शिंदे यांना भाजपकडून गृहखातं देण्यात आलं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नाहीतर गृहखातं न मिळाल्यास एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दुसऱ्याला उपमुख्यमंत्री पद देणार असल्याची शक्यता आहे. तर महायुतीमध्ये शिंदे गटाला बारा ते तेरा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा दर्शवला असला तरी सध्या गृहखात्यावर शिंदे अडून बसले आहेत. गृहखातं मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. जर गृहमंत्रीपद दिलं गेलं नाही तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेतील एखाद्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना गृहखातं दिलं जाणार का? न मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याकडे जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.