Eknath Shinde Ladka Bhau : बहिणी पाठोपाठ भाऊ लाडका, विद्यार्थ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Continues below advertisement

राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादषीनिमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. त्यामुळे आता बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.

राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram