Eknath Shinde PC : उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'अॅनाकोंडा' टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ते अॅनाकोंडा स्वतः आहेत, गेले पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर विळखा घालून बसले आहेत आणि त्यांचं पोट कधीच भरत नाही', असा थेट हल्लाबोल शिंदे यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबईकरांना देण्यासाठी आले होते, घेण्यासाठी नाही, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर मुंबईतील रुग्णांची खिचडी, डेड बॉडी बॅग, रस्त्यातील डांबर आणि मिठी नदीतील गाळ गिळल्याचा गंभीर आरोप केला. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections) मतदारांच्या याद्यांवरून विरोधक करत असलेले आरोप हे पराभवाच्या भीतीतून आहेत, असेही शिंदे म्हणाले. आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement