Cabinet Reshuffle | शिंदेंनी मंत्र्यांना दिले कामाचे डोस, फेरबदलाचे संकेत!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रिमंडळात अपेक्षित परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत मिळाल्याची माहिती आहे. माणिकराव कोकाडे प्रकरणानंतर शिंदेंनी मंत्र्यांना माध्यमांसमोर कमी बोलून जास्त काम करण्याच्या सूचना दिल्या. "विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, त्यांना कामातून उत्तर द्या," असे त्यांनी स्पष्ट केले. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचे आणि पक्षाचे नाव खराब होते, हे लक्षात ठेवण्यासही त्यांनी बजावले. मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात अपेक्षित निकाल दिसला पाहिजे, अशी ताकीदही त्यांनी दिली. संसदेच्या कामात खासदारांनी हिरीरीने भाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या सूचनाही मंत्र्यांना देण्यात आल्या. फक्त श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडून चालणार नाही, सर्व खासदारांनी पक्षाची भूमिका मांडावी, असेही नमूद करण्यात आले. इंडियाचा सर्वात जुना मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचे अस्तित्व ठसठशीत दिसायला हवे, असेही सांगण्यात आले.