CM Eknath Shinde Helps Victim : रस्त्यात रिक्षेचा अपघात, ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात
Eknath Shinde in Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून गेलेले पाहायला मिळाले आहेत. शिंदे यांनी ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला रुग्णालयात पोहोचवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले.
मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर शिंदेंचा ताफा कळव्याकडे निघाला
शहरात आज (दि.20) मे निमित्त सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटूंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.