Eknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतात
Eknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतात
हेही वाचा :
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाला. या विस्तारात महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारसंघात गेले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, सरकारच्यावतीने नव्या मंत्र्यांना दालनाचे व बंगल्यांचे वाटप करण्यात आलं आहे. त्यावरुन, आता राजी नाराजी सुरू असून अनेक मंत्रीमहोदयांनी आपला कार्यभारही स्वीकारला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला. कधी काळी ज्या मंत्रालयात अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायचं काम केलं, त्याच मंत्रालयात आज मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले. प्रताप सरनाईक यांना राज्य सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची (Mantralay) जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी बिकट परिस्थितीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. घरची परिस्थिती बिकट असल्याने याच मंत्रालयामध्ये मी कधीकाळी अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायला येत होतो. आज या मंत्रालयात मंत्री म्हणून कार्यभार स्विकारल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला, तसेच जुने दिवसांतील संघर्षही माध्यमांसमोर व्यक्त केला. अगरबत्ती विकण्यापासून ते अंडा बुर्जीची गाडी चालवली, रिक्षा चालवली, त्यानंतर उद्योजक झालो आणि आज मंत्री म्हणून मंत्रालयात बसलो आहे, असे त्यांनी म्हटले.