
Maharashtra 30 Police Transfer : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 30 बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली
Continues below advertisement
मुंबई: राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते (Sadanand Date) यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Police Amitabh Gupta Vishwas Nangre Patil Sadanand Date Aarti Singh 'Eknath Shinde 'Maharashtra