Thane Polls: ठाण्यात महायुतीमध्ये बिघाडी? 'एकत्र की स्वतंत्र' लढण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार Eknath Shinde यांना
Continues below advertisement
ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'ठाण्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचं, हे ठरवण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने, येथे जागा वाटपावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्यास नाराज नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात सामील होण्याचा धोका असल्याने, ठाण्यापुरता निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य शिंदे यांना देण्यात आल्याचे समजते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement