पालकमंत्रिपदानंतर महायुतीत महामंडळ वाटपाचाही फॉर्म्युला ठरला? भाजपचा प्रस्ताव शिंदेंकडून अमान्य?
Continues below advertisement
पालकमंत्रिपदानंतर महायुतीत महामंडळ वाटपाचाही फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीय... भाजपकडून ५०-२५-२५ असा फॉर्म्युला ठेवण्यात आलाय.. ५० टक्के महामंडळं भाजपला, २५ टक्के महामंडळं अजित पवार गटाला, तर २५ टक्के महामंडळं शिंदे गटाला देण्यात यावीत असं भाजपचं म्हणणं आहे.. तर शिंदे गटानं ४०-३०-३० असा फॉर्म्युला समोर ठेवलाय.. जेवढी महामंडळं शिंदे गटाला मिळतील तेवढीच महामंडळ आमच्याही पदरात पडावीत अशी अजित पवार गटाची मागणी आहे.. येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement