Eknath Shinde Thane Gudi Padwa : एकनाथ शिंदे ठाण्यात, गुढीपाडव्याच्या मिवणुकीत झाले सहभागी ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यातील कोपरी इथल्या श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. दरवर्षी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत देवीचा आगमन सोहळा पार पाडतो.. मात्र यंदा मुख्यमंत्री पद तसेच अधिवेशन सुरू असल्याने कोपरीकरांना मुख्यमंत्री येणार की नाही याची धास्ती होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मतदारसंघात साजरा होणाऱ्या या उत्सवात वेळात वेळ काढून हजर राहिले.. आणि त्यांनी केवळ हजेरी लावली नाही, तर सामान्य ठाणेकराप्रमाणे मिरवणुकीत सहभागी झाले आणि नंतर त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली..
Continues below advertisement