Shinde Camp vs BJP : विधान परिषदेच्या उमेदवारी, देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गट-भाजपात धुसफूस?
विधान परिषदेची उमेदवारी आणि देवेन भारतींच्या नियुक्तीवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरून नाराजीचा सूर उमटल्याचंही समजतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी बोलून दाखवल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर उमेदवार दिल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी नुकताच केला होता.