Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी साताऱ्यातून उघड केलेल्या शेकडो कोटींच्या मेफेड्रॉन ड्रग्ज रॅकेटवरून, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत..
ज्या सावरी गावात पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केलं, त्या रॅकेटमधील आरोपींना.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लहान भाऊ प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमधून जेवणाचा डबा जायचा अशी माहिती अंधारेंनी दिली... या रिसॉर्टजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये, परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकत.. पोलिसांनी पंचेचाळीस किलो ड्रग्ज पकडले होते... तसंच ज्या शेडमध्ये ड्रग्ज पकडलं होतं, त्याची चावी असलेल्या ओंकार दिघेला ताब्यात घेऊन पोलिसांनी का सोडलं? असा सवाल उपस्थित करत, ड्रग्ज कारवाईबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी माहिती लपवल्याचा दावाही अंधारेंनी केलाय.. कोयना बॅकवॉटरच्या मागच्या बाजूस, एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंचं रिसॉर्ट आहे.. आणि त्या रिसॉर्टजवळील शेडवर छापा टाकत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला..

तर सुषमा अंधारेंनी केलेले ड्रग्जचे आरोप प्रकाश शिंदेंनी फेटाळलेत.. प्रकाश शिंदेंनी एबीपी माझाशी बातचीत करताना काय प्रतिक्रिया दिली पाहूया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola