Eknath Khadse Robbery : चोरी प्रकरणी २ आरोपी अटकेत, मुख्य आरोपी अजूनही फरार
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगावमधील (Jalgaon) घरी झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र घरफोडी करणारे तीन मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 'घरातून काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह CD आणि Pen Drive चोरीला गेले आहेत', असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, परंतु त्यात कोणतीही कागदपत्रे, सीडी किंवा पेन ड्राईव्ह आढळलेला नाही. या चोरीमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास झाली होती. पोलिसांनी उल्हासनगर कनेक्शनचा छडा लावला असून, फरार असलेल्या मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement