Eknath Khadse | पंतप्रधान मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसे यांच्याकडून रिट्वीट
Continues below advertisement
एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे संकेत त्यांच्या ट्वीटमधून मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं एक ट्वीट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. तेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केलं आहे. खडसे यांची ही कृती सूचक मानली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात लागलेल्या खडसेंच्या पोस्टरमधून भाजपचं कमळही गायब आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत आहे. पण भाजप सोडून खडसे कुठेही जाणार नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ट्विटरवरुन दिलेले संकेत महत्त्वाचे आहेत.
Continues below advertisement