Eknath Khadse PC :भोसरी प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचला, ₹1500 कोटींच्या जमिनीसाठी सूड: खडसेंचा पलटवार

Continues below advertisement
पुण्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'पुण्यातील १५०० कोटी रुपयांच्या जमिनीचा घोटाळा मी उघडकीस आणल्यामुळेच, माझ्याविरुद्ध भोसरी प्रकरणात खोटी तक्रार करून मला अडकवण्यात आले', असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी सांगितले की, पुणे येथील गोपोडी परिसरातील ही १५ एकर सरकारी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न हेमंत गावंडे आणि त्यांच्या साथीदारांनी केला. २०१४ मध्ये विरोधी पक्षनेता आणि नंतर मंत्री असताना आपण हा प्रकार उघड करून जमीन वाचवली, म्हणूनच सूडबुद्धीने गावंडे यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले, असे खडसे म्हणाले. याच प्रकरणी हेमंत गावंडे आणि इतर आठ जणांविरुद्ध काल खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली. २०१५ साली आपल्याच सूचनेवरून गावंडेंवर गुन्हा दाखल होऊनही कारवाई न झाल्याने असे प्रकार सुरूच राहिल्याचा दावा त्यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola