Eggs Price : थंडीचा कडाका वाढूनही अंडी स्वस्त, अंडी 50 पैसे ते 1 रुपयानं स्वस्त
थंडीच्या दिवसात महाग होणारी अंडी यावर्षी स्वस्त झाली, राज्याच्या सीमाभागात अंड्याचा दर ५० पैसे ते १ रुपयानं कमी झालाय. कोरोना संसर्ग वाढल्यानं शेजारच्या राज्यांतील शाळा बंद आहेत किंवा पूर्ण क्षमतेनं सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहारात दिली जाणारी अंडी बाजारात विक्रीसाठी पाठवावी लागलीत. पुरवठा वाढल्यानं अंडी स्वस्त झालीत. तामिळनाडूतून रोज सुमारे ७० लाख अंडी शाळांमधील दिली जातात. त्यातली ५ ते ६ लाख अंडी अमरावती जिल्ह्यात येतात.