Egg Rates Hike : थंडीच्या आगमनामुळे अंड्यांच्या दरात मोठी वाढ, डझनामागे 12 रुपये वाढले

राज्यात थंडीचं आगमन झालं आहे. त्यामुळं मस्त गरमागरम आणि मसालेदार अंडाकरीची फर्माईश तुम्ही करणार असाल तर थोडं थांबा. ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यात थंडी वाढू लागताच अंड्यांच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. डझनामागे अंड्यांचा दर १२ ते १५ रुपयांनी वाढला आहे. किरकोळ  मार्केटमध्ये अंडी डझनाला ६६ रुपयांवरून ७८ रुपयांवर पोहोचली आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि रायगड परिसरात दिवसाला ८० ते ८५ लाख अंड्यांची आवक व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा वीस लाखांनी अधिक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola