Swaraj Foundation Palghar : कोरोना काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण, बोलकी शाळा मदतीसाठी पुढारली
Continues below advertisement
Palghar : देशात कोरोना काळात ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था डगमगली असून जव्हार, मोखाडा , विक्रमगड या भागात नेटवर्क प्रॉब्लेम , पालकांची अँड्रॉइड मोबाइल घेण्याची नसलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी स्वराज फाउंडेशन यांनी बोलकी शाळा हा प्रयोग सुरू केला होता. आज वर्षभरानंतर ग्रामीण भागात अजूनही शाळा सुरू झाल्या नसून ऑनलाइन शिक्षण सुरू नसल्याने पालघरच्या आदिवासीबहुल पाड्यांमध्ये दिगंत स्वराज्य फाउंडेशन च्या माध्यमातून बोलक्या शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या बोलक्या शाळेची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली असल्याने विद्यार्थी आवर्जून या शाळेत आपली हजेरी लावत आहेत.
Continues below advertisement