Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या कोटोलमधील घरी झाडाझडतीनंतर EDचं पथक परतलं

 ईडीकडून अनिल देशमुख यांच्या काटोल येथील घरी तपास, कुटुंबियांच्या विविध संपत्तीची आणि व्यवहारांची दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची कागदपत्रंही मागितल्याची माहिती. ईडीचे पथक चार गाड्यांमध्ये नागपूरच्या दिशेने रवाना झाले.  चार गाड्यांच्या  मधल्या दोन गाड्यांमध्ये ईडीचे आठ ते दहा अधिकारी होते. तर समोर आणि मागे सीआरपीएफच्या हत्यारबंद गाड्या होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे ईडीने काटोल मध्ये देशमुख कुटुंबियांचा शेतीचा व्यवहार पाहणाऱ्या पंकज देशमुखला त्यांच्या वडविहिरा या गावातून आणून त्याच्या उपस्थितीमध्ये सर्व तपास केले आहे.. मिळालेल्या माहितीप्रमाणे ईडीच्या पथकाने काटोल येथील घरी देशमुख कुटुंबीयांच्या विविध संपत्तीचे आणि व्यवहारांचे अगदी दहा ते पंधरा वर्ष जुने कागदपत्रंही मागितली.. सकाळी आठ ते दुपारी एक वाजे दरम्यान ईडीचे आठ ते दहा अधिकारी काटोल येथील बंगल्यात तपास करत होते...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola