ED Raid : अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी

मुंबई :  कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीने बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी टाच आणल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola