ED Raids: कोल्ड्रिप कफ सिरप प्रकरण, चेन्नईत सात ठिकाणी ईडीचे छापे

Continues below advertisement
विषारी कोल्ड्रिप (Colddrip) कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) झालेल्या २२ मुलांच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी चेन्नई (Chennai) येथील Sresan Pharma या उत्पादक कंपनीशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. कंपनीचे मालक जी. रंगनाथन (G Ranganathan) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) औषध नियंत्रण कार्यालयातील उच्च अधिकार्‍यांच्या निवासस्थानांवरही धाडी टाकण्यात आल्या. हा तपास Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत केला जात असून, कंपनीचे आर्थिक व्यवहार आणि अधिकाऱ्यांसोबतच्या अवैध देवानघेवाणीची चौकशी केली जात आहे. कोल्ड्रिप सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (diethylene glycol) या विषारी औद्योगिक सॉल्व्हेंटचे प्रमाण घातक पातळीवर आढळले होते, ज्यामुळे मुलांच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola