Arjun Khotkar ED : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये EDचा छापा, नेते अर्जुन खोतकर समितीचे सभापती
Continues below advertisement
शिवसेना नेते अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरूय , सकाळी दहा वाजल्यापासून हे पथक बाजार समितीच्या कार्यालयात तपासणी करत आहे, कालच अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी तसेच या बाजार समितीमध्ये या पथकाने सकाळी आठ वाजल्यापासून छापा सत्र सुरू केलं होतं मध्यरात्री दोनच्या सुमारास खोतकर यांच्या घरून रात्री दोन वाजता हे पथक रवाना झाले असले तरी आज दुसऱ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छापेमारी सुरुच आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.
Continues below advertisement