Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

Continues below advertisement

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं झालं काय याचा तपास ईडी करणार आहे.  या पैशांचा वापर कसा करण्यात आला आहे, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का या सर्वांचा तपास आता ईडी करणार आहे. कोलकात्यातील काही शेल कंपन्या अनिल देशमुखांच्या नातेवाईकांच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे. 

हा गुन्हा दाखल करताना ईडीने अनिल देशमुख आणि इतर असा शब्द वापरला आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकरणात आणखी काही नावं आली तर त्यांचीही चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram