Ratnakar Gutte | रासप आमदार रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई, 255 कोटींची मालमत्ता जप्त
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले होते. त्या प्रकरणी ईडी कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे उचलल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पावर लिमिटेड इतर कंपन्यांमध्ये लावली ज्यांच्यावर आता ईडीने कारवाई केलीय.
Continues below advertisement