ECI PC Voter List Row: देशव्यापी मतदार यादीची फेरछाननी होणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Continues below advertisement
देशभरात मतचोरी आणि मतदार यादीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आहे. या परिषदेत देशव्यापी मतदार यादी फेरछाननी (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या घोषणेनुसार, पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगाल (West Bengal), तमिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), आसाम (Assam) आणि पुडुचेरी (Puducherry) या राज्यांचा समावेश असू शकतो, जिथे २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी स्वच्छ करण्याची मागणी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) लावून धरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा समावेश पहिल्या टप्प्यात होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement