Eastern Express Highway Traffic | मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, दृश्यमानता कमी

Continues below advertisement
मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे आणि अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घाटकोपर आणि सायनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सायन परिसरात सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे. ठाण्याच्या दिशेने, तसेच भांडुप आणि मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची गतीही संथ झाली आहे. वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी विरुद्ध दिशेची एक लेन सुरू करण्यात आली आहे. मात्र, कमी दृश्यमानता आणि मुसळधार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील स्थिती गंभीर आहे. वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola