E-Bus Vasai Virar : वसई-विरारच्या रस्त्यावर आता इलेक्ट्रिक बस धावणार! स्वातंत्र्यदिनी लोकार्पण

E-Bus Vasai Virar : वसई-विरारच्या रस्त्यावर आता इलेक्ट्रिक बस धावणार! स्वातंत्र्यदिनी लोकार्पण

 वसई विरारच्या रस्त्यावर आता इलेक्ट्रिक बस धावणार आहे. आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत  या ई बस सेवेचं लोकार्पण  केलं. यावेळी वसई चे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता कार्यक्रमाअंतर्गत (ncap) वसई विरार महानगरपालिकेस ५७ ई बस खरेदी करणेकामी ८१ कोटी ७९ लाख ५० हजार इतका निधी मंजूर झालेला होता. त्यातून ५७ कोटी ४० लाख इतका निधी पालिकेला प्राप्त झालेला होता. त्यातून ४० ई बस पालिकेने खरेदी केले आहे, आणखीन ३० बस दाखल होणार आहेत. त्यानंतर आणखीन १७ बस पुढील वर्षी दाखल हो आहेत. 
या बसची एका सिंगल चार्जिंग मध्ये कमीत कमी १८० कि.मी. धावण्याची क्षमता आहे. ३१ प्रवासी यात प्रवास करू शकतात. या बसमुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येण्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. 
या चालू ई बस मधून आढावा घेवून, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola