Eknath Shinde Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं, NESCO मध्ये धडाडणार तोफ
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे आझाद मैदानाऐवजी बंदिस्त जागेत मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नेस्को सेंटरमध्ये व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली असून, एलईडी स्क्रीन बसवण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे. डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन फवारणी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी पन्नास हजार शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत; ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर, तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. शिंदे नेमकी कार्यकर्त्यांना काय संबोधित करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामगारांकडून युद्धपातळीवर तयारी केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement