Eknath Shinde Dasara Melava : शिंदेंच्या सेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, तयारीचा संपूर्ण आढावा

Continues below advertisement
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही गटांचे दसरा मेळावे स्वतंत्रपणे पार पडत आहेत. ठाकरे गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क येथे होत असताना, शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान निश्चित केले आहे. यंदाही शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावरच होणार असून, त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे, परंतु आता चिखलावर कार्पेट टाकून स्टेज उभारणी आणि इतर कामांना सुरुवात झाली आहे. शिवसैनिक मोठ्या संख्येने दसऱ्याला मुंबईत दाखल होतात. त्यांच्या बसण्यासाठी खुर्च्या, एलईडी स्क्रीनिंग आणि लाईटची व्यवस्था केली जात आहे. मंचाचे कामही सुरू झाले आहे. आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी आझाद मैदानावरून या तयारीचा आढावा घेतला. मिडिया जर्नलिस्ट अनिल संगाणे यांच्यासह अजय माने यांनी मुंबईतून ही माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola