Vegetable Price Hike : मुसळधार पावसामुळे भाज्यांना फटका, भाज्यांचे दर कडाडले : ABP Majha
आता टोमॅटो 120 रुपयांवर गेला असून इतर भाज्यांचे दरही तितकेच झाले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे. इंधनाचे दरही गगनाला भिडले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई कमी झाल्याचा दावा करणारे एनडीए सरकार तोंडावर आपटले आहे.
मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. परंतु इंधनाचे दरही कडाडल्यामुळे आणि रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे माल बाजारात पोहोचेपर्यंत भाज्या सडून जात आहेत. त्यामुळे भाज्या आणि कडधान्येही कडाडल्याचे चित्र आहे. पावसामुळे टोमॅटो, कांदा, बटाटा आणि मोठय़ा प्रमाणावर भाज्या अक्षरशः सडून गेल्या असून दिल्ली एनसीआरमध्ये तर टोमॅटो आणि अनेक भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे.
दिल्ली ते गल्ली भाज्यांनी शंभरी पार केल्याचे चित्र आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 27 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोची किरकोळ किंमत 77 रुपये तर मुंबईसह महाराष्ट्रात 80 ते 90 रु. प्रतिकिलो होती.