Marathwada Water Shortage : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, सध्या 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक
Continues below advertisement
मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जाणवतायत.. सध्या २३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.. मार्च अखेरीस पाणीटंचाई भासू लागलीये त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरु झालाय. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमधील ३९९ गावं, ९१ वाड्यांना ६०६ टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरचा आकडा सध्या आहे. त्या खालोखाल जालना शहराचा क्रमांक आहे. या दोन जिल्ह्यांत 565 टँकरने पाणीपुरवठा होत असून पुढील दोन महिन्यांत 1 हजारांपर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती आहे..
Continues below advertisement