Ganesh Visarjan Mumbai Routes Changed : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत बदल
Continues below advertisement
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबई वाहतुक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही रस्त्यावर वाहतुक आणि पार्किंगलाही बंदी असेल. बंद करण्यात येणाऱ्या मार्गांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहतूक विभागाने केली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, ठाकूर द्वार, व्हीपी रोड, जे एस एस रोड, एस व्ही पी रोड, राजाराम मोहन रॉय रोड, कफपरेड मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आवश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला मुंबई वाहतुक पोलिसांकडून देण्यात येतोय.
Continues below advertisement