Kalyan : वालधुनी नदीत नशेच्या धुंदीत तरुणाची उडी, वाहून जाणाऱ्या तरुणाला कल्याण पोलिसांनी वाचवलं

Continues below advertisement

कल्याण डोंबिवली शहरालगतच्या नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरात निर्माण झालेली पूरस्थिती ओसरली असली तरी अद्यापि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज दुपार च्या सुमारास वालधुनी नदीत पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून जाणाऱ्या तरुणाला  पोलिसांनी बाहेर काढत जीवदान दिले आहे.
सलमान अन्सारी हा 24 वर्षीय युवक नशेत धुंद असल्याने तो पालिकेच्या गणेश घाट डेपोच्या मागील बाजूने नदीत उतरला मात्र नदीच्या प्रवाहाबरोबर तो वाहत जाऊ लागला मात्र शहाड येथील पुलाजवळ असलेल्या खांबाला  तो अडकला एक तरुण बुडत असल्याचे पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत दोरीच्या साहाय्याने या तरुणाला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पोलिस आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram