Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह

Continues below advertisement

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह

भांडुपच्या बंद असलेल्या ड्रीम मॉल मध्ये एक तरुणीचा मृतदेह आढळला  तरुणी अज्ञात आहे  बेसमेंट मध्ये साचलेले मोठ्या प्रमाणात पाणी    भांडुप पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रीम्स मॉल बेसमेंट या ठिकाणी पाण्यात एक अनोळखी महिला वय वर्ष 30 ते 35 हिचा 09.40 चे सुमारास मृतदेह मिळून आला आहे. सदरचा मृतदेह मुलुंड जनरल हॉस्पिटल या ठिकाणी भांडुप वन मोबाईल च्या मदतीने  पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे चालू आहे.

हे ही वाचा..

 केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने 24 वर्षीय तरुणी ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2022 मध्ये या तरुणीने मुलीने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन प्रियकराची हत्या केली. मुलीचे लग्न दुसरीकडे निश्चित झाले होते, त्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराचीच हत्या केली होती.  काका निर्मला कुमारन नायरला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी दोषी आढळला असून त्याल 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मुलीच्या आईची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केला

शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले की, हे दुर्मिळ प्रकरणांपैकी दुर्मिळ प्रकरण आहे. मुलीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केल्याने समाजात चांगला संदेश गेला नाही. ग्रीष्माच्या वकिलाने सांगितले की, ती शिक्षित आहे आणि तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तसेच त्याच्याकडे कोणतेही गुन्हे नोंद नाहीत. अशा परिस्थितीत शिक्षा कमी व्हायला हवी. कोर्टाने आपल्या 586 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचे वय आणि इतर परिस्थिती विचारात घेण्याची गरज नाही. ग्रिष्माने नियोजनपूर्वक शेरॉनची हत्या केली. अटकेनंतर तपास वळावा म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram