Draupadi Murmu Goa Tour : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोवा दौऱ्यावर, विद्यार्थ्यांना पाहताच थांबवला ताफा

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.  यावेळी फोंड्यात काही विद्यार्थ्यांना पाहून त्यांनी अचानक आपला ताफा थांबवला  आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांनी फोंड्यातील जीव्हीएम कॉलेजला भेट दिली.  त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola