Dr. Meenal Khatgaonkar : डॉ. मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक

Continues below advertisement

Dr. Meenal Khatgaonkar : डॉ. मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक 

राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने योग्य त्या उमेदवारासाठी राज्यात बैठका घेण्यास सुरुवात केली असून राजकीय घटनांना वेग आलाय. दरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची सून डॉ. मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपला बंड करण्याचा इशारा दिलाय. दोन वेळा पक्षादेश मानला, आता संधी नाही मिळाली तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवलीय. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून डॉक्टर मीनल खतगावकर इच्छुक आहेत. नायगाव मध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार असून याच मतदारसंघातून त्या इच्छुक असल्याने भाजपकडून आता नक्की कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच बंडाचा इशारा 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची स्नुषा मीनल खतगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. पण 2019 मध्ये विधानसभेला आणि 2024 मध्ये नांदेड लोकसभेसाठी इच्छुक होत्या. दोन्ही वेळा त्यांना माघार घ्यावी लागल्याने आता पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवलीय. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील समीकरणे हे पूर्णपणे बदलले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram