Dr Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट नेमका काय?

Continues below advertisement

Dr Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट नेमका काय?

सध्या गाजत असलेल्या छावा सिनेमानंतर अनेक बाजूंना विविध चर्चा रंगल्या आहेत. इतिहासातल्या दाखल्यांवरून खल सुरू आहेत. मात्र त्याचवेळी छोट्या पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारणारे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनीही मोठा गौप्यस्फोट केलाय. 'स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवताना महाराजांचं बलिदान न दाखवण्यासाठी दबाव होता असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. 
डॉ. अमोल कोल्हेंनी मालिकेच्या शेवटासंदर्भात खुलासा केलाय. नैतिकता पाळली तरी हेतूवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अमोल कोल्हेंनी यावर नाराजी दर्शवलीय.
हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवले जावे, याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखविण्यात आल्याचे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. तसचं मालिकेच्या शेवटासंदर्भात शरद पवारांनी कोणतीही सूचना केली नसल्याचं अमोल कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केलंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola