Dombivli Demolition Row | समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीवरील कारवाई स्थगित, ठाकरे गट रहिवाशांच्या पाठिशी
डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीवरील कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. पालिकेने कारवाई केल्यास स्वतःसोबत कुटुंबाला जाळून घेण्याचा इशारा महिला रहिवाशांनी दिला होता. रहिवाशांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला असून, कारवाई होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. एका रहिवाशाने "मी पेट्रोल टाकून माझ्या पुरा परिवाराला जाळून टाकेल। जोपर्यंत माझे इथं रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला एक हातोडा पडवून देणार नाही।" असे म्हटले आहे. रहिवाशांनी २२ लाखांचे कर्ज आणि चार लाखांचे डाउन पेमेंट केल्याचे सांगितले. एसबीआय बँकेकडून कर्ज झाल्याचेही नमूद केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हायकोर्टाची ऑर्डर दुसऱ्या बिल्डिंगच्या नावाने असताना समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ६५ इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. कोणत्या बिल्डरला वाचवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.