Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पोलिसांकडून लाठीचे फटके

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पोलिसांकडून लाठीचे फटके

डोंबिवली येथे झालेल्या औद्योगिक स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला मात्र अजूनही सहा जणांची ओळख पटली नसून काही जणांचे तर केवळ अवशेष सापडल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण दोन कामगारांचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या कंपनीच्या शेजारीच दिवसरात्र वाट बघतायत. दुर्दैवाची बाब म्हणजे या नातेवाईकांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याच्या ऐवजी पोलिसांकडून काठीचे फटके खावे लागत आहेत.पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि त्यांची टीम प्रसारमाध्यमांशी देखील अशाच प्रकारे वागणूक करताना दिसतायत. या स्फोटात भरत जयस्वाल बेपत्ता झालेत. भरत जयस्वाल पंधरा दिवसांपूर्वीच अनुदान कंपनीत कामाला लागले होते, परवा झालेल्या स्फोटानंतर ते अजूनही सापडले नाहीत असा दावा त्यांच्या भावाने केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola