Dombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मान

Continues below advertisement

Dombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मान

मराठी पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ डोंबिवली तर्फे पत्रकारीतेत मोलाची कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे अँकर आश्विन बापट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकारितचे बदलते स्वरूप या विषयावर आश्विन बापट यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकताना सर्वच मंत्रमुग्ध झाले होते. याशिवाय एबीपी माझाचे कल्याण-डोंबिवलीचे प्रतिनिधी सुरेश काटे यांना देखील पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या दोघांशिवाय वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे गौरव करण्यात आला

हे ही वाचा..

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकारण तापलं असताना आज गाठीभेटींचा धडाका पाहायला मिळाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी राज्यपाल महोदयांची भेट घेत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनजंय मुंडेंनी (Dhananjay munde) आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला असून अजित पवारांनी निर्णय राखून ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, अजित पवारांनी (Ajit pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तातडीने भेट घेतल्याने या चर्चा जोर धरु लागल्या. दरम्यान, धनंजय मुंडेंनी एबीपी माझीशी बोलताना राजीनाम्याबाबत माहिती दिली. मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला ना मी राजीनामा दिला, अशा शब्दात राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलं आहे.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram