Nawab Malik यांचा नार्को टेस्ट करा, नवाब मलिक इतके दिवस का नाही बोलले? , आशिष शेलारांची टीका
Nawab Malik vs Devendra Fadnavis : बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही, असं आव्हान नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर तुम्ही राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तेव्हा काय केलं? कारवाई का केली नाही? असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपाचा धमाका केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या मोठ्या आरोपाची आठवणही मलिकांनी यावेळी करुन दिली. पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमच्या कार्यकाळात झालेली पार्टी दिसली नाही का? या पार्टीतील एका टेबलची किंमत 15 लाख रुपये होती. या पार्टीत नक्कीच ड्रग्ज वापरले गेले असतील. ही पार्टी तुम्हाला नाही का दिसली? असा सवाल मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावेळी नवाब मलिक यांनी जावयाचा बचाव केला. शिवाय समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले.