Dnyaneshwari Munde suicide attempt | SP भेटीनंतर विष प्राशन, १८ महिन्यांपासून न्याय नाही!

महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कौअत यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे यांची तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. याचवेळी त्यांनी विषाली द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडे यांना ताब्यात घेतले. सध्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात अठरा महिन्यांपासून एकही आरोपी अटक झालेला नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे. पोलीस प्रशासनाला दिलेलं अल्टिमेटम संपल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश फोड यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, "संयम तुटला असं वाटतं." या प्रकरणात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola