Diwali 2021 : वर्धा जिल्ह्यात फराळ महोत्सावचं आयोजन, ग्रामीण भागातील महिलांसाठी राजगाराची उमेद

Continues below advertisement

दिवाळी म्हटलं की डोळ्यापुढं येतात वेगवेगळे फराळांचे पदार्थ. पण सध्याच्या धकाधकीच्या युगात अनेकांना फराळाचे पदार्थ बाहेरूनच घ्यावे लागतात.  त्यात घरगुती चवीचा फराळ ग्राहकांना मिळावा आणि त्यातून दोन पैसे महिलांच्या पदरात पडावेत याकरीता वर्ध्यात फराळ महोत्सावचं आयोजन करण्यात आला आहे. या महोत्सवात चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळ, अनरसे, शेवं, बर्फी यासारखे अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले असून वर्ध्यात कलेक्टर ऑफीसजवळ असलेल्या हॉकर्स प्लाझा भागात हे स्टॉल लावण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांसोबतच इथे पणत्या, रांगोळ्या, आकाश कंदील, मेणबत्त्या, लाईटही विक्रसाठी उपलब्ध आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram