सिद्धरामेश्वर यात्रेच्या परवानगीबाबत पेच कायम, नंदीध्वजाच्या पूजेच्या मुद्दयावरून वाद
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र यात्रेच्या परवानगी बाबत अद्याप पेच कायम आहे. तर दुसरीकडे नंदीध्वजाच्या पूजेच्या मुद्यावरून मानकरी आणि भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सिद्धेश्वर यात्रा सुरु होण्यापूर्वी नंदीध्वज सराव मोठ्या उत्साहात केला जातो. मात्र अद्याप शासनाची यात्रेबाबत कोणीतही परवानगी मिळाली नसतानाही जगदीश पाटील यांनी घरासमोर नंदीध्वज उभारून पत्नीसह पूजा केली. यामुद्यावरून सिध्देश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू यांनी जगदीश पाटील यांना जाब विचारला.